
‘स्व’ची जाणिव होण्याच्या मार्गावर जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आणि शक्यतांचे अनेक दरवाजे उघडण्यासाठीची गुरुकिल्ली गीतेमध्ये आहे. अशीच एक गुरुकिल्ली म्हणजे इतरांमध्ये स्वत:ला बघणे आणि इतरांना स्वत:त. श्रीकृष्ण आपल्याला वारंवार सांगतात की आपल्या सगळ्यांमध्ये ‘तो’ विद्यमान आहे आणि जे प्रकट झालेले नाही अशा निराकार तत्त्वाकडे तो अंगुलीनिर्देश करतो आहे. इतर एका ठिकाणी तो असेही म्हणतो की जणू काही आपण देवापुढे झुकतो आहोत अशा पद्धतीने गाढवा किंवा चोरासमोर झुकावे.
इंद्रियांद्वारे प्रसारित केलेल्या माहितीच्या आधारे, आपल्या मेंदूला परिस्थितीचे सुरक्षित/आनंददायी किंवा असुरक्षित/अप्रिय असे विभाजन करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. पुढे येणार्या धोक्यांपासून बचावासाठी असे करणे आवश्यक असते. कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणेच मन हे दुधारी शस्त्र आहे आणि ते त्याची सीमा ओलांडून आपल्यावर अधिराज्य गाजवू बघत असते. अहंकाराचा जन्म अशाच ठिकाणी होतो. अनुभवांची विभागणी किंवा मूल्यमापन कमी करावे आणि एकत्व निर्माण व्हावे यासाठी आपण मनाला गुलाम बनवायला हवे असे ही गुरुकिल्ली सांगते. अशा एकत्वाशिवाय आपल्या शरीरासह कोणतीही गुंतागुंतीची भौतिक व्यवस्था टिकून राहू शकत नाही.
जेव्हा आपण हा खात्रीलायक उपाय वापरतो, तेव्हा आपण इतरांबद्दल सहानुभूती निर्माण करतो आणि आपली जागरूकता वाढवतो. हे करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ज्या व्यक्तीला आपण शत्रू मानतो अशा व्यक्तीपासून सुरुवात करावी आणि त्या व्यक्तीला भगवंत मानावे. अर्थात हे खूप कठीण आहे कारण अनेक नकोशा आठवणी आणि भावना त्या व्यक्तीशी जोडलेल्या असतात आणि काळानुरूप तो दु:खभाव कमी होतो आणि आनंदाला जागा करून देतो. खरे तर, आपण सगळ्यांनी कधी ना कधी हे असे केलेले असते मात्र ते अधिकाधिक वेळा करण्याची सवय लावून घ्यायला हवी.
गीतेने सांगितलेल्या मार्गात स्वतःची जाणीव आणि इतरांबद्दलची करुणा ही विवेकाच्या किनार्यावर पोहोचण्यासाठी नावेच्या दोन ओव्यांप्रमाणे आहे.
एकदा आपण हे समजून घेतले की, आपण कोरोना महामारीमध्ये भगवान श्रीकृष्ण पाहू शकतो का?