द्वंद्वातीत म्हणजे द्वैताच्या पलीकडे जाणे, हे गीतेतील आणखी गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला विविध संदर्भात ही अवस्था प्राप्त करण्याचा सल्ला देतात.
मानवतेला चकित करणारा सामान्य प्रश्न हा आहे की आपण आनंद मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाही आपल्या जीवनात दुःख कसे येते. आत्मपरीक्षण करण्याऐवजी, कदाचित आपले प्रयत्न पुरेसे नाहीत असे सांगून आपण स्वतःला सांत्वना देतो. तथापि, आशा आणि अहंकार आपल्याला आनंदाच्या शोधाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त करतात आणि हे आयुष्यभर चालू राहते. द्वैताच्या पलीकडे समजून घेणे हा या समस्येवर उपाय आहे.
प्रकट जगात, प्रत्येक गोष्ट त्याच्या मूलभूत स्वरूपात विरुद्ध ध्रुवांच्या जोडीच्या रूपात अस्तित्वात आहे, म्हणजे द्वैत. जन्माचा विरुद्ध ध्रुव म्हणजे मृत्यू; सुखाचा विरुद्ध ध्रुव म्हणजे दुःख; विजयाचा पराजय; नफा तोटा; बेरीज वजाबाकी; प्रशंसा टीका; सशर्त प्रेमाचा द्वेष; अशी यादी मोठी आहे.
आपण एखाद्या गोष्टीचा पाठलाग करीत असतो तेव्हा त्याच जोडीने त्याच्या अगदी विरुद्ध बाबही आपल्या मागेमागे येत असते हा नियम आहे. आपण एका बाजुने काठी उचलली तर तिची दुसरी बाजू उचलली जाणार हे निश्चित आहे. लोलकाचेही उदाहरण असेच आहे. तो जेव्हा एका बाजूला जातो तेव्हाच तो दुसर्या बाजूलाही जाणार हे निश्चित असते.
याच तत्त्वानुसार, काळाच्या ओघात कोव्हिड-19 चा लोलक एक दिवस आनंदाकडे जाईल असा विश्वास होता. इतिहास सांगतो की सुधारित विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अशा कठीण परिस्थितीतही आपण सुखाचे दिवस आणले आहेत. कोव्हिड-19 सारख्या टोकाच्या परिस्थितीमध्ये आपल्या अंतरात्म्याकडे वळविण्याचे सामर्थ्य असते.
श्रीकृष्ण आपल्याला हे ध्रुव ओलांडण्यास सांगतात. वर्तमानात असणे हे भूतकाळ आणि भविष्याच्या पलीकडे आहे. त्याचप्रमाणे, बिनशर्त प्रेम हे सशर्त प्रेम आणि द्वेषाच्या पलीकडे आहे.
आपण या ध्रुवांदरम्यान डोलत असताना आपल्याला या द्वैतांची जाणीव असणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत ध्रुवीयतेच्या संपर्कात येणे स्वाभाविक आहे आणि ही जाणीव आपल्याला त्या ओलांडण्यास मदत करेल.