Gita Acharan |Marathi

आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की आपल्या सर्व कृतींना आपणच कारणीभूत आहोत आणि आपण आपल्या भविष्याचे कर्ते आणि मालक आहोत. गीतेमध्ये, भगवान श्रीकृष्ण म्हणतात गुणांच्या संवादातून किंवा एकत्र येण्यातून कर्माची उत्पत्ती होते मात्र ते कर्त्यामुळे होते असे नाही. प्रकृतीच्या गर्भातून त्रिगुणांची निर्मिती झाली आहे आणि त्यांमुळे आत्मा हा भौतिक शरीराशी बांधला जातो. हे त्रिगुण- सत्व, रज आणि तम- आपल्या सर्वांमध्ये भिन्न प्रमाणात अस्तित्वात असतात. सत्व गुण हा ज्ञानाशी जोडला असतो, रजोगुण हा कृतीशी आणि तमोगुण हा अज्ञान आणि निष्काळजीपणाशी जोडला असतो.

इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन्स एकत्र आले की विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या पदार्थांची निर्मिती करतात, तसेच त्रिगुणांच्या एकत्र येण्यातून आपले स्वभाव आणि कृती आकारास येत असतात. आपल्यापैकी प्रत्येकात एक कोणता तरी गुण इतर गुणांपेक्षा वरचढ ठरत असतो. वस्तुत:, लोकांमधील संवाद किंवा संबंध हा इतर काही नसून व्यक्तींच्या गुणांमधील संवाद किंवा संबंध असतो. 

ज्याप्रमाणे विद्युत चुंबकीय़ क्षेत्रात ठेवलेला चुंबक त्याच क्षेत्रामध्ये फिरतो, त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वस्तू आकर्षित होतात. असे अनेक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे, कर्म हे कोणत्याही कर्त्यामुळे होत नसून गुणांमुळे होते. भगवान श्रीकृष्ण स्वयंचलिततेकडे निर्देश करतात म्हणजेच भौतिक जगात आपोआप घडणारे कार्य. आपले स्वतःचे भौतिक शरीर देखील आपोआप कार्य करते. 

हे गुण आणि कर्म यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी एक पद्धतशीर चौकट सादर करत आहे परंतु या सत्याची जाणीव आणि संक्रमण तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या जीवनातील अनुभवातून ते जाणतो. 

या जाणिवेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार आहे. आपल्या रोजच्या जगण्याची सवय झाल्याने आपल्याला हा विश्वास वाटायला लागतो की आपणच कर्ता आहोत आणि त्यातून आपल्या अहंकाराची निर्मिती होते. प्रत्यक्षात मात्र या तीन गुणांमधील संवाद हा कर्माची निर्मिती करतो. 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आत्म-सुधारणेची ही जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर आहे आणि इतर कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही.


 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!