Gita Acharan |Marathi

अर्जुन मनाची तुलना वायूशी करतो आणि त्यावर नियंत्रण कसे आणावे हे त्याला जाणून घ्यायचे आहे, जेणेकरून संतुलन साधले जावे. श्रीकृष्ण म्हणतात की हे निश्चितच अवघड आहे पण वैराग्य सरावाने ते साध्य करता येते. 

इंद्रियांद्वारे गोळा केलेली माहिती सुरक्षित किंवा असुरक्षित असी विभाजित करण्यासाठी मेंदू विकसित झाला आहे. हे करण्यासाठी मेंदू स्मरणशक्ती वापरतो. या क्षमतेने उत्क्रांतीच्या काळात आम्हाला जगण्यास आणि समृद्ध होण्यास मदत केली. 

मेंदूची हीच क्षमता अंतर्गत निर्णयासाठी देखील वापरली जाऊ शकते, ज्याला जागरूकता म्हणतात. आपले विचार आणि भावना यांची जाणीवपूर्वक पुनरावृत्ती करून आपण आपल्या मेंदूची निर्णय क्षमता वाढवू शकतो. आजच्या आधुनिक युगात संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशाच प्रकारे तंत्रज्ञान वापरले जात आहे. भगवान श्रीकृष्ण हे आंतरिक सामर्थ्य अभ्यासातून विकसित करण्याचे संकेत देत आहेत कारण ती नैसर्गिकरित्या येत नाही. न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून, हे नवीन न्यूरल पॅटर्न तयार करण्यासारखे आहे.

वैराग्य समजून घेण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध असलेला राग समजून घेणे. राग म्हणजे आपल्या प्रकट जगातील भौतिक सुखांच्या मागे धावणे आहे जसे बाह्य सौंदर्य, रोजगार आणि भौतिक सुविधा. द्वंद्वाच्या संकल्पनेनुसार, प्रत्येक रागाचा शेवट हा वैराग्यात होतो. मात्र, आपले सगळे लक्ष हे रागावर केंद्रित झालेले असते आणि आपण वैराग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करतो. 

स्टॉइसिझम सारखी काही तत्त्वज्ञाने ही मृत्यू जो वैराग्याचे अंतिम टोक आहे या संकल्पनेचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्याला ‘Memento Mori’  असे म्हणतात, म्हणजे मृत्युला वारंवार भेटत राहणे. यामध्ये, मृत्युची आठवण राहावी म्हणून ते लोक कामाच्या ठिकाणी किंवा घरी महत्वाच्या जागेवर कुठले तरी स्मृतिचिन्ह ठेवतात (Memento) जेणेकरून मृत्युची भावना सातत्याने जागृत राहावी. भारतीय तत्त्वज्ञानानुसार त्याला स्मशान वैराग्य असे म्हणतात. 

श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही वैराग्याचा सराव केला तर त्यामुळे तुमचा मेंदू केंद्रस्थानी स्थिर होईल. 

लॉकडाउनच्या काळाने आपल्याला वैराग्याच्या क्षणांची झलक दाखविली आहे. वैराग्याची किंचितही जाणिव झाल्यास, आपल्याला शांतता आणि आनंद मिळविण्यासाठी गरजेचे असलेले संतुलित मेंदूचे लक्ष्य गाठणे शक्य होईल. 

 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!