
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हीच तुमचे मित्र असता आणि शत्रूही. जाळ्यात सापडलेल्या एका माकडाची कथा नेमके हेच सांगते.
निमुळते तोंड असलेल्या एका सुरईमध्ये काही दाणे ठेवलेले असतात. मात्र, त्या दाण्यांपर्यंत माकडाचा हात क्वचितच प्रवेश करू शकतो. कसे तरी करून माकड त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईत हात घालले आणि त्यामध्ये ठेवलेले दाणे आपल्या मुठीत घेले. दाणे घेलल्याने मुठीचा आकार वाढतो आणि त्यामुळे हात सुरईबाहेर काढणे माकडाला अशक्य होते. माकडाला वाटते कुणीतरी आपल्याला पकडण्यासाठी सापळा रचला आहे. मात्र, तो हे विसरून जातो की त्याच्याच कृतीमुळे तो या सापळ्यात अडकला आहे. या माकडाला कितीही सांगितले की मुठीतील दाणे टाकून दे तरी तो ते करणार नाही, उलट आपण त्याचे दाणे हडपण्यासाठी हे करतो आहोत असेच त्याला वाटेल.
बाहेरून बघितल्यावर हातातील दाणे टाकून देणे ही किती सोपी गोष्ट आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण, जेव्हा आपण अशा दुविधेत अडकले असू तेव्हा आपली काय स्थिती होते याचा विचार केल्यावर हे किती कठीण आहे याची आपल्याला जाणीव होते.
बंद मूठ हा आपला शत्रू तर उघडी मूठ आपला मित्र आहे. मूठ बंद ठेवावी की उघडी आणि मित्र बनवायचा की शत्रू हे आपल्यावर अवलंबून आहे.
प्रत्यक्ष जगण्यात अशा अनेक सापळ्यांमध्ये आपण अडकत असतो. ते दाणे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून ‘मी’ आणि ‘माझे’ हे आहे आणि आपला अहंकार त्यांना धरून ठेवत असतो. या सापळ्यातून मुक्त होण्यासाठी आणि अंतिम मुक्ती मिळवण्यासाठी आपण या अहंकाराचा त्याग केला पाहिजे हे श्रीमदभगवद्गीता आपल्याला वारंवार सांगत असते.
प्रचंड कोलाहल असलेल्या या जगात जगण्याचा वेग कमी करून आपण शांतपणे चालू लागतो तेव्हा या सापळ्यांची जाणिव सहजपणे होती.