Gita Acharan |Marathi

रडरला जोडलेल्या ट्रीम टॅबमधील लहान सा बदल ही मोठ्या जहाजाची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे, श्रीमदभगवद्गीता अभ्यासण्याची आतून आलेली इच्छा ही तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते.

अगदी बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत स्वत:ला समजून घेण्यासाठी श्रीमदभगवद्गीता हे कायमस्वरुपी पाठ्यपुस्तक आहे आणि शक्य आहे की त्यातील फारच थोड्या संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर कळतील. अव्यक्त आणि व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर ते सहज समजू शकतात. अव्यक्त म्हणजे जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि व्यक्त ते आहे जे इंद्रियांच्या कक्षेत आहे. 

प्रकट गोष्टींचा प्रारंभ हा बिग बॅंगपासून होतो. त्यामध्ये तारे, तार्‍यांच्या गाभ्यात असलेल्या उच्च रासायनिक घटकांच्या अणूंचे एकत्रीकरण, तार्‍यांच्या स्फोटांमध्ये या घटकांचा झालेला प्रसार, ग्रहमालांची निर्मिती आणि बुद्धियुक्त जीवन आकारास येणे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. संपूर्ण वैज्ञानिक समुहाने हे मान्य केले आहे की जरी काळाची अंदाजित परिमाणे बदलली तरीही प्रकट झालेले जीवन, ग्रह, तारे आणि अगदी विश्वदेखील अस्तित्वाच्या एका विशिष्ट कालबद्ध चौकटीत सामावले आहे. तथापि, या कालावधीचे प्रमाण भिन्न असू शकते.

प्रकट दृष्टीकोनाच्या आधारे विचार केला तर आपण जन्मापासून मृत्युपर्यंत अस्तित्वात असतो ही समज योग्य ठरते. गीतेने सांगितल्यानुसार आणि अप्रकट दृष्टीकोनाच्या आधारे आपण जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतरही अस्तित्वात असतो. ही गोष्ट जर स्पष्टपणे समजली असेल तर आपण प्रकट आणि अप्रकट मधील नाते समजून घेऊ शकतो. या जाणिवेने, आपण त्यांच्यातील संबंध सहजपणे समजून घेऊ शकतो आणि ही समज आपल्याला अव्यक्त साकार करण्याच्या ध्येयाकडे घेऊन जाऊ शकते ज्याला मोक्ष म्हणतात. 

हे ध्येय साध्य करण्यामध्ये, अहंकार हा अडथळा असला, तरी बाह्य सुखदु:खाच्या पल्याड जाऊन, जो आनंद आपल्यात भरू राहतो, तो आनंद आपण अप्रकटाच्या प्राप्तीसाठी पूर्ण केलेला प्रवासाचा निर्देशक ठरतो.                                     




 

 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!