
श्रीमद्भगवद्गीतेचा जन्म रणांगणात झाला आणि महामारीचा काळ (COVID-19) कुरुक्षेत्र युद्धासारखाच होता. गीतेतील एक शब्द हे सगळेच अचूकपणे मांडतो आणि तो शब्द म्हणजे निमित्तमात्र- परमात्याच्या हातातील केवळ एक साधन असणे.
अर्जुनाला श्रीकृष्ण जसा होता तसाच पाहायचा होता आणि त्याला समजून घेण्यासाठी एका अतिरिक्त शक्तीची गरज होती, जसे एखाद्या आंधळ्याला पूर्ण हत्ती पाहण्यासाठी डोळ्यांची गरज असते. भगवान श्रीकृष्णाने त्याला त्यांचे वैश्विक रूप पाहण्यासाठी दिव्य डोळे दिले होते. विश्वरूप दाखवण्याव्यतिरिक्त, श्रीकृष्ण त्याला भविष्यात पाहण्याची दृष्टी देतात आणि अर्जुनाला अनेक योद्धे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करताना दिसतात.
नंतर भगवंत त्याला म्हणतात, हे योद्धे लवकरच मरणार आहेत आणि या प्रक्रियेतील तू केवळ एक साधन आहेस. श्रीकृष्ण त्याला हे स्पष्टपणे सांगतात की तू कर्ता नाहीस आणि दुसरे म्हणजे तो हे निश्चित करतो की जेव्हा अर्जुन युद्धात विजयी होईल तेव्हा तो अहंकारमुक्त असला पाहिजे कारण अहंकार हा विजयामुळेच सर्वाधिक प्रज्वलित होतो.
त्याच वेळी, श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीही सोडू देत नाही. निमित्तमात्र असणे ही आपल्याला आतल्या आत होणारी जाणिव आहे आणि त्यातून अत्यंत शुद्ध भाव निर्माण होतो आणि आपण अहंकारापासून मुक्त होतो.
कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावरील किंवा नियंत्रण कक्षात लोकांना होणारा त्रास अर्जुनच्या दुःखासारखा आहे. यावर कोणताही इलाज नसल्यामुळे, आपण आतून फक्त निमित्तमात्र आहोत आणि बाहेरच्या जगात आपल्याला सोपवलेल्या जबाबदाऱ्या शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत. ही छोटीशी जाणीव खरोखरच एक वरदान ठरू शकते कारण गीतेच्या अनेक संकल्पना जीवनात, विशेषतः कठीण परिस्थितीत अनुभवल्याशिवाय स्पष्ट होत नाहीत. कोळशाचा तुकडा अत्यंत दाबाने हिऱ्यात बदलतो आणि आगीत गरम केल्याने सोने शुद्ध होते.
अशा प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळेच आपण निमित्तमात्र असल्याची जाणिव जन्माला येते आणि त्यातून आपण शरणागततेच्या मार्गाने अंतरात्म्याच्या अधिक जवळ जातो.