Gita Acharan |Marathi

गीता आपण काय आहोत याबद्दल आहे. सत्य जाणून घेण्या बरोबरच सत्यशील होण्या सारखे आहे आणि ते तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा असे घडते.

राज्यपद प्राप्त करण्यासाठी आपले मित्र, नातेवाईक, ज्येष्ठ आणि शिक्षक यांना जर आपण मारले तर आपल्या प्रतिमेचे काय होईल, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील या दुविधेत अर्जुन अडकला होता. तसे पाहिले तर हे अत्यंत तर्कशुद्ध आणि स्वाभाविक आहे आणि जर एखाद्याला गीतेनुसार आयुष्य जगायचे असेल तर त्याला हा पहिला अडथळा दूर करणे आवश्यक आहे. 

अर्जुनाला खरी चिंता ही आपल्या भविष्याची होती, तर श्रीकृष्ण म्हणतो की आपल्याला कर्म करायचा अधिकार आहे मात्र कर्मफळाचा नाही. का? कारण कर्म हे वर्तमानकाळात घडत असते आणि कर्मफळ हा भविष्याचा भाग आहे. 

अर्जुनाप्रमाणेच आपणही परिणामांचा विचार करून कृती करत असतो. आधुनिक जगण्यात आपल्याला असेही वाटत असते की भविष्यात होणारे परिणामही आपण नियंत्रित करू शकतो. प्रत्यक्षात मात्र भविष्य हे अनेकविध शक्यतांचा समुच्चय असून त्यावर आपले काहीही नियंत्रण नाही. 

आपला अहंकार आपल्या भूतकाळावर अवलंबून असतो आणि आपण भविष्यकाळ वर्तमानावर प्रोजेक्ट करतो, ज्यामुळे आपण वर्तमानात जगू शकत नाही. 

अवकाशाचा विचार केला तर आकाशगंगा, तारे आणि ग्रह यांनी भरलेले संपूर्ण विश्व हे सतत फ़िरत असते, ज्यामध्ये एक स्थिर अक्ष असतो आणि त्याभोवती सतत फिरणारी रचना असते. हा अक्ष कधीही ढळत नाही आणि त्याच्याशिवाय काहीही गोल फिरू शकत नाही. प्रत्येक वादळात एक शांत बिंदू असतो आणि त्याशिवाय, कोणत्याही वादळाला गती प्राप्त होऊ शकत नाही. मध्यबिंदूपासून जितके जास्त अंतर, तितका गोंधळ आणि प्रक्षुब्धता जास्त. 

आपल्यातही एक शांत मध्यबिंदू असतो आणि तो म्हणजे आपला अंतरात्मा. आपले प्रक्षुब्ध आणि गोंधळांनी भरलेले जीवन, त्याच्याशी निगडित अनेक घटकांसह या शांतबिंदूंच्या भवताल फिरत असते. अर्जुनाचा संभ्रमही अशाच एका घटकाबाबत आहे- त्याची प्रतिमा. अर्जुनाप्रमाणेच आपणही इतरांच्या नजरेने आपल्याबद्दल प्रतिमा तयार करतो आणि आपल्या अंतरात्म्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. 

म्हणूनच गीता म्हणते की आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि स्वतःला विवेकाशी जोडले पाहिजे.


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!